Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विद्यार्थ्‍याच्‍या वैद्यकिय शिक्षणासाठी सीएसआरच्‍या माध्‍यमातुन ७.५० लक्ष रुपयाचा निधीची मदत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विद्यार्थ्‍याच्‍या वैद्यकिय शिक्षणासाठी सीएसआरच्‍या माध्‍यमातुन ७.५० लक्ष रुपयाचा निधीची मदत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत ...
विद्यार्थ्‍याच्‍या वैद्यकिय शिक्षणासाठी सीएसआरच्‍या माध्‍यमातुन ७.५० लक्ष रुपयाचा निधीची मदत
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरच्‍या गरीब विद्यार्थ्‍याला मदतीचा हात दिला आहे. नचिकेत विजय लाखे या चंद्रपूरातील नगीनाबाग परिसरात विद्यार्थ्‍याला एमबीबीएस अभ्‍यासक्रमाचे प्रवेश शुल्‍क, पुस्‍तकांसाठी पैसे व नीट परिक्षेसाठी लागणारी मदत आ. मुनगंटीवार यांनी सीएसआर निधीतुन उपलब्‍ध करण्‍यासाठी केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले असून यासर्व आवश्‍यक बाबींसाठी ७.५० लक्ष रू. रक्‍कम या विद्यार्थ्‍याचे पुर्ण शिक्षण होईपर्यंत मिळणार आहे.
विविध विकासकामांसाठी सीएसआरच्‍या माध्‍यमातुन निधी उपलब्‍ध करण्‍यासाठी लौकीकप्राप्‍त असलेल्‍या आ. मुनगंटीवार यांनी असंख्‍य रूग्‍णांना वैद्यकिय मदत मिळवून देण्‍यासाठी स्‍वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. नचिकेत लाखे या गरीब विद्यार्थ्‍याच्‍या वैद्यकिय शिक्षणासाठी मदत मिळवून देत आ. मुनगंटीवार यांनी या विद्यार्थ्‍यांचे भविष्‍य उज्‍वल होण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्‍याच्‍या पालकांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top