Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव दिन म्हणून साजरा करण्यात आला इयत...
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी - प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे
शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव दिन म्हणून साजरा करण्यात आला
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके व शालेय पोषण आहार वितरित करण्यात आले
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ नांदा द्वारा संचालित श्री प्रभू रामचंद्र विद्यालय महाविद्यालय नांदा येथे शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव तथा प्राचार्य मुसळे हे उपस्थित होते अतिथी म्हणून कालयाचे ज्येष्ठ शिक्षक संदीप खिरडकर, रुपेश विरुटकर, रामकृष्ण रोगे, अजय बारसागडे, अरुण कुसळकर, शकील शेख, भारती अग्रहरी, सोनू गोंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. येणारे शैक्षणिक सत्र 2022 2023 नुकतेच सुरू झाले असून शासनाच्या निर्देशानुसार शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्साहपूर्ण व नाविन्यपूर्ण वाटावा यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भेटवस्तू व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली शिवाय शालेय पोषण आहार वितरित करण्यात आले. वर्गपुढे रांगोळ्या, फुलं टाकून व आकर्षक करून विद्यार्थ्यांना पुष्प देत त्यांचे स्वागत करण्यात आले. 
   सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शेडमाके यांनी केले तर प्रज्ञा आवारी यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी तसेच पालक सुद्धा उपस्थित होते दहावी आणि बारावी मध्ये द्वितीय तथा तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top