Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विद्यार्थ्यांसह बबनभाऊ आगारात धडकतात तेव्हा.....
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विद्यार्थ्यांसह बबनभाऊ आगारात धडकतात तेव्हा..... सोनुर्ली-सोंडो-देवाळा बस सेवा उद्या पासून होणार सुरु आगार प्रमुखांचे आश्वासन विरेंद्र पुणेक...
विद्यार्थ्यांसह बबनभाऊ आगारात धडकतात तेव्हा.....
सोनुर्ली-सोंडो-देवाळा बस सेवा उद्या पासून होणार सुरु
आगार प्रमुखांचे आश्वासन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शाळा सुरु झाल्यामुळे सोनुर्ली-सोंडो-देवाळा परिसरारील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी  विद्यार्थ्यांनी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्याशी संपर्क करुन त्यांना यासंबंधिची माहिती दिली असता त्यांनी विद्यार्थ्यांसह आगाराला भेट देत आगार व्यवस्थपकांनी महेश राखडे व खिरटकर यांचेशी चर्चा करुन त्वरित बससेवा सुरु करण्याची मागणी केली. यावर आगार व्यवस्थपकांनी उद्या सकाळ पासून बसच्या दोन फेऱ्या सुरु करण्याचे निर्देश दिले. सर्व विध्यार्थ्यानी याबद्दल बबनभाऊंचे आभार मानले.
याप्रसंगी लखामा बापूजी जुमनाके बेरडी, हेमंत गौरकर, उरकुडे गुरुजी आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top