Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामस्थांनी दिला शाळा बंद करण्याचा इशारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रामस्थांनी दिला शाळा बंद करण्याचा इशारा शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामस्थ संतप्त धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - कोरप...
ग्रामस्थांनी दिला शाळा बंद करण्याचा इशारा
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामस्थ संतप्त
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील कान्हळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सहावीपर्यंतच्या शिक्षकांची गेल्या एक ते दोन महिन्यांपासून चार पदे रिक्त आहेत. संबंधित विभागाला माहिती देऊनही रिक्त पदे भरण्याची विनंती करूनही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. रिक्त शिक्षक पदे 15 दिवसांत न भरल्यास शाळा बंद करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
शाळा सुरू झाल्या, मात्र शिक्षकांची रिक्त पदे अद्याप भरलेली नाहीत. १५ दिवसांत रिक्त पदे न भरल्यास शाळा बंद करण्याचा इशारा कोरपना तालुका भाजप तालुकाध्यक्ष तथा कान्हाळगाव शाळा समिती अध्यक्ष नारायण हिवरकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात कोरपना पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
विभागाच्या दुर्लक्षामुळे मुलांना योग्य शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. अशीच स्थिती राहिल्यास मुलांचे भविष्य अंधकारमय होईल. मुलांच्या शिक्षणाची चिंता पालकांना सतावत असून अनेक पालकांनी टीसी काढून मुलांना दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्याची तयारी केली आहे. असे झाल्यास शाळा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे कोरोनाच्या काळात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे शिक्षकांची कमतरता आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांत शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, अन्यथा शाळेला टाळे ठोकण्यात येईल. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनाही ही माहिती देण्यात आली. आता याबाबत संबंधित विभाग काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top