Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राष्ट्रवादी संवाद सभा - शेतकऱ्यांच्या समस्या बाबत झाली चर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रवादी संवाद सभा - शेतकऱ्यांच्या समस्याबाबत झाली चर्चा "राष्ट्रवादी आपल्या दारी, दोन तास पक्षासाठी" या उपक्रमांतर्गत नोकारी ब...
राष्ट्रवादी संवाद सभा - शेतकऱ्यांच्या समस्याबाबत झाली चर्चा
"राष्ट्रवादी आपल्या दारी, दोन तास पक्षासाठी" या उपक्रमांतर्गत नोकारी बु. येथे राष्ट्रवादी ग्राम संवाद सभा 
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या दोन तारखेला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी निर्देशानुसार ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवर "राष्ट्रवादी आपल्या दारी, दोन तास पक्षासाठी" या उपक्रमांतर्गत नोकारी बु. येथे राष्ट्रवादी ग्राम संवाद सभा घेण्यात आली. चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आबिद अली यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला पक्षाने घेतलेल्या कार्यक्रमाची व धोरणाची माहिती दिली. यावेळी नोकारी येथील शेतकऱ्यांनी अमलनाला धरणामध्ये भूसंपादनाव्यतिरिक्त चार आदिवासी शेतकऱ्यांची जमीन गाळपैर क्षेत्रात असून धरणाचे पाणी त्यामध्ये साचत आहे. यामुळे गेल्या पाच-सात वर्षापासून आम्हाला उत्पादनापासून मुकावे लागले अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली तसेच धरणाची उंची वाढल्यानंतर जल संचयन क्षेत्रामध्ये वाढ झाल्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाचे अधिकाऱ्याशी संपर्क करून स्थळ पंचनामा व नुकसानी बाबत पाठपुरावा करू अशी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी शासनामार्फत शेतकऱ्यांना लहरी निसर्गामुळे दुबार पेरणीची पाळी आल्याचे शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केली. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी कामगार यांना केंद्रबिंदू ठरवून पक्ष कार्य करीत असल्याचे सांगितले. यावेळी मारू पाटील गेडाम, भाऊराव कनाके, केशव कुळमेथे, बालाजी गडदे, महादेव कुडमेचे, गणेश सिडाम यांचे सह अनेक युवक व शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top