Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - भोयगांव-कवठाळा- गडचा...
कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
भोयगांव-कवठाळा- गडचांदुर या मार्गावर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशीनरी ही मोठी आहे. रस्ता बांधकाम करताना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतक सुरू ठेवल्यास लहान वाहनांना येण्याजाण्याकरीता रस्ता अपूरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळ कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई करण्यात आल्याचे पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.
कवठाळा ते गडचांदूर हा रस्ता जड वाहनाकरीता पूर्णपणे बंद करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचना केली होती. त्याप्रमाणे मुंबई पोलिस अधिनियम-1951 च्या कलम- 33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये, सदर वाहतूक बंद करण्यात आली आहे. 
यापूर्वी 2 जून ते 30 जून 2022 पर्यंत वाहतूक बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर कालावधीत रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण न झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविल्यामुळे  30 जुलै 2022 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंदी ठेवण्यात आली आहे. जनतेने पर्यायी मार्ग म्हणून गडचांदुरकडून चंद्रपुरकडे येणारी जड वाहतूक ही गडचांदूर- राजुरा-बल्लारशा-चंद्रपुर या मार्गाचा वापर करावा. तसेच गडचांदुरकडून घुग्घुसकडे जाणारी जड वाहतुक ही गडचांदुर-आवाळपुर-गाडेगांव-कवठाळा- भोयगांव-घुग्गुस या मार्गांचा वापर करावा, असे कळविण्यात आले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top