जनसेवा हीच ईश्वर सेवा मानत सामाजिक बांधिलकी जोपासत रोटरी क्लब द्वारा होत असलेले सेवाकार्य प्रशंसनीय - हरीश शर्मा
घनश्याम बुरडकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
रोटरी क्लब ही बल्लारपुर शहरातील विविध सामाजिक कार्यक्रम राबवून जनसामान्यांचे निस्वार्थ सेवा करणारी संस्था आहे. या संस्थेचा वतीने ही परंपरा पुढे नेण्याकरिता सण 2022-23 करिता नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा व राजेश पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत व रोटरी क्लबचे निवर्तमान अध्यक्ष मनीष मूलचंदानी, सचिव उमेश पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल चरपे, सचिव महेश कायरकर यांचा पदग्रहन करवित पुढील जवाबदारी सोपविण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रोटरी क्लबचे सदस्य प्रशांत दोंतुलवार, अजय वासलवार, प्रशांत भोरे, वैभव मेनेवार, राजू मुंदडा, विक्रम पंडित, उत्तम पटेल, राहुल वरु इत्यादी सदस्य उपस्थित होते. तसेच पाहुण्यांमध्ये पत्रकार ज्ञानेन्द्र आर्य, श्रीनिवास कंदिकुरी, घनष्याम बुरडकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निलेश चिमड्यालवार यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.