Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नागपूर-चंद्रपूर मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्‍याचा निर्णय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागपूर-चंद्रपूर मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्‍याचा निर्णय आ. मुनगंटीवार यांनी केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन ! ही मेट्र...
नागपूर-चंद्रपूर मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्‍याचा निर्णय
आ. मुनगंटीवार यांनी केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन !
ही मेट्रो बल्‍लारपूर पर्यंत धावणार – श्री. नितीन गडकरी यांची मान्‍यता
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
नागपूर-चंद्रपूर या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतल्‍याबद्दल माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांचे अभिनंदन करत आभार व्‍यक्‍त केले आहे. ही मेट्रो बल्‍लारपूर पर्यंत वाढविण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. नितीनजी गडकरी यांच्‍याकडे केली. गडकरी यांनी ही मेट्रो बल्‍लारपूर पर्यंत वाढविण्‍याची मागणी मान्‍य केली आहे.
नागपूर-चंद्रपूर या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने श्री. नितीनजी गडकरी यांच्‍याकडे केली होती. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. नितीनजी गडकरी यांच्‍याकडे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. चंद्रपूर जिल्‍हा राज्‍यातील प्रमुख औद्योगिक जिल्‍हा आहे. चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक महत्‍व विशेष आहे. नागपूर-चंद्रपूर हा प्रवास अत्‍यल्‍प दरात व्‍हावा व जलदगतीने हे अंतर पूर्ण व्‍हावे अशी भुमीका या मेट्रो संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. आज या निर्णयानंतर नितीनजी गडकरी यांचे अभिनंदन करताना ही मेट्रो जिल्‍हयातील दुसरे प्रमुख औद्योगिक शहर बल्‍लारपूर पर्यंत वाढवावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. गडकरी यांच्‍याकडे केली. या मागणीला देखील नितीनजी गडकरी यांनी तात्‍काळ मान्‍यता दिली.
नागपूर-चंद्रपूर-बल्‍लारपूर या मार्गावर लवकरच ब्रॉडगेज मेट्रो धावणार असल्‍याने चंद्रपूर, बल्‍लारपूर येथील नागरिकांना प्रवासाची उत्‍तम सोय उपलब्‍ध होणार आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top