लोकवस्तीमधिल नियमबाह्य दारू दुकानाविरोधात जनविकास सेना आक्रमक
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटल्यानंतर दारू दुकानांचे स्थलांतरणास तसेच नविन दारू दुकानांना मंजुरी देताना 18 ते 20 कोटीची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने एक प्रसिद्धी पत्रक काढून कोणतीही देवाण-घेवाण झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच तक्रारी असल्यास पुराव्यासह निवेदन देण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जनविकास सेनेने आज भर पावसात दुपारी 1 वाजताच्या दरम्यान जटपूरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. तसेच रिक्षामध्ये पुरावे भरून एका तक्रारीसह सर्व पुरावे उपनिवासी जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केले.
या पदयात्रेमध्ये जनविकास सेना महिला आघाडीच्या मनिषा बोबडे, अभा रिपाईच्या निर्मला नगराळे, जनविकासचे आकाश लोडे, राहुल दडमल, गितेश शेंडे, अजित दखने, प्रफुल बैरम, इमदाद शेख, अक्षय येरगुडे, अजय महाडोळे, सतिश ददगाड, किशोर महाजन, देवराव हटवार, अनिल कोयचाळे, जलदिप येरमे, देवराव हटवार, मनिष आसुटकर,दिनेश कंम्पू, प्रफुल बजाईत, प्रविण अतेरकर, बेबीताई राठोड, प्रतिभा तेलतुंबडे, प्रतिमा भोपारे, मेघा दखणे, निलिमा वणकर, भाग्यश्री मुधोळकर, बबिता लोडेलीवार, दर्शना झाडे, गीता दैवलकर इत्यादींनी सहभाग घेतला.
पप्पू यांनी चालविला पुराव्यांचा रिक्षा
आज निघालेल्या पदयात्रेमध्ये जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी स्वतः पुरावे असलेला रिक्षा चालविला. तसेच हा रिक्षा त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेला.पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रिक्षा डविण्याचा प्रयत्न केला. परंतु चार चाकी वाहनांना कार्यालयात प्रवेश असताना रिक्षाची अडवणूक करणे योग्य नसल्याचे देशमुख यांनी उपस्थित पोलिसांना निदर्शनास आणून दिले आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रिक्षा घेऊन गेले.
जनविकास सेनेचे आता जिल्हाधिकाऱ्यांना ओपन चॅलेंज
लोकवस्ती मधील नियमबाह्य दारू दुकानाचे विरोधात आक्रमक झालेल्या जनविकास सेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्षात नेऊन पुरावे दिले. दिलेली तक्रार व पुराव्याच्या अनुषंगाने लोकवस्ती मधील नियमबाह्य दारू मंजुरी रद्द करण्यात यावी. अन्यथा सादर केलेले पुरावे चुकीचे असल्याचे सात दिवसात सिद्ध करावे. मात्र असे न केल्यास सात दिवसानंतर दारू दुकानांच्या स्थलांतरण व नवीन दारू दुकानांना मंजुरी देण्याच्या प्रकरणात देवाण-घेवाण झाल्याचे मान्य करावे असे थेट आव्हानच देशमुख यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.