Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विरूर (स्टे.) येथे पंचायत समिती गणाची भाजपा संघटनात्मक बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरूर (स्टे.) येथे पंचायत समिती गणाची भाजपा संघटनात्मक बैठक संपन्न भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्याचा घेतला आढावा विरेंद्र पुणेकर - आमचा ...
विरूर (स्टे.) येथे पंचायत समिती गणाची भाजपा संघटनात्मक बैठक संपन्न
भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्याचा घेतला आढावा
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे पंचायत समिती गणाची बैठक भाजप जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली,सदर बैठकीच्या सुरवातीला जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्वांनी अभिवादन केले. 
बैठकी दरम्यान,बूथ रचेसंदर्भात विस्तृत मार्गदर्शन करून येणाऱ्या मन-की-बात कार्यक्रमांची तयारी, ०८ वर्षेपूर्ती निमित्याने करावयाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन,गावोगावी नविन लोकांचे पक्षप्रवेश घेणे,मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती द्यावी, लाभार्थ्यांशी संवाद साधावे यासोबतच नव्याने सुरू होत असलेल्या अग्निपथ योजनेची सविस्तर माहिती देत भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थितांशी संवाद साधला. 
बैठकीत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांतील कार्यकारण्या पुर्ण करण्यात आल्या, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सिंधी येथील कॉंग्रेसचे माजी सरपंच  मधुकर धानोरकर व महेश धानोरकर यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला, त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून सहर्ष स्वागत केले. 
या बैठकीला,माजी आमदार सुदर्शन निमकर,तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे,जिल्हा उपाध्यक्ष सतिश धोटे,महामंत्री प्रशांत घरोटे, सतिश कोमरवेल्लीवार, भिमराव पाला,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,प्रदिप बोबडे,अरविंद वांढरे,दादाजी जिवतोडे,बाळनाथ वडस्कर, मनोहर निमकर,शामराव कस्तुरवार,अंबादास कुळमेथे, साईनाथ झूरमुरे,शेख हसन, शंकर धनवलकर,गुलाब चहारे, सौ.भारतीताई मेश्राम,सौ. वैशालीताई वडस्कर,प्रदिप पाला, रुपेश कोमरवेल्लीवार आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top