Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ट्रॅव्हल्स उलटली - दहा जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रॅव्हल्स उलटली - दहा जखमी आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क सावली - हैदराबाद येथून मध्यप्रदेश राज्यातील लांजी जिल्हा बालाघाट येथे प्रवाशी घेऊन ज...
ट्रॅव्हल्स उलटली - दहा जखमी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
सावली -
हैदराबाद येथून मध्यप्रदेश राज्यातील लांजी जिल्हा बालाघाट येथे प्रवाशी घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक सिजी 07 सिजी 6168 चा आज सकाळी 10 वाजताचा दरम्यान चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील किसान नगर जवळ अपघात झाला. या अपघातात दहाच्या जवळपास प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे. या ट्रॅव्हल्स मध्ये पन्नासहून अधिक प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती मिळाली असून सदर ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने जात असताना वाहन चालकाचे वाहणावरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली. अपघात होताच घटनास्थळी या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी अनेक प्रवाशांना ट्रॅव्हल्स मधून बाहेर काढले व त्यांना सावली ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना खाजगी ट्रॅव्हल्स ने नागपूर येथे नेण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top