उत्तम सुविधा असलेले सुसज्ज ग्राम ग्रंथालय भविष्याच्या दृष्टीने गावासाठी वरदान ठरेल - गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे
लक्कडकोट येथील राजभवनाची ग्राम ग्रंथालयसाठी निवड
श्रमदानातून राजभवनाची स्वच्छता
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
“पढाई भी, सफाई भी" या अभियानाअंतर्गत लक्कडकोट येथील ग्राम राजभवन इमारतीची ग्राम ग्रंथालय साठी निवड केली आहे. मात्र हे राजभवन निर्मिती पासून स्थानिक ग्रामपंचायत ला हस्तातरीत करण्यात आलेली नाही परिणामी ही इमारत व परिसर दुर्लक्षित झाल्याने काटेरी झुडपी वाढल्यानी जंगल झाले होते याची दुरुस्ती करून ग्रामपंचायतला हस्तांतरित करण्याची मागणी होती. त्याकडे दुर्लक्ष होत होते, दरम्यान नव्यानेच रुजू झाले गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवें यांनी सदर परिसराची ग्राम ग्रंथालयासाठी पाहणी केली परंतु झुडपी जंगल अवस्था पाहून ग्रामस्थ व पंचायत समिती कर्मचारी यांचेशी चर्चा केली आणि दिनांक 27 जून रोजी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी यांनी मिळून स्वच्छता मोहीम राबविली, परिसरातील काटेरी झुडपे तोडून साफसफाई केली आणि कित्येक वर्षांपासून काटेरी झुडपात बंदिस्त राजभवनाने मोकळा श्वास घेतला.
अतिशय देखणी अशी इमारत असून सुध्दा फक्त वापरात नसल्यामुळे तिची जिर्णावस्था झाली होती. मात्र सर्वांच्या श्रमदानाने या वास्तूचे पुनःरुजीवन क्य झाले. या मोहिमेत स्थानिक तंटामुक्त समिती अध्यक्ष राकेश लाडसे, माजी उपसरपंच मनोज मून, ग्रामपंचायत सदस्य शंकर राठोड, रामचंद्र काटकर, रवी दुर्गे, नितीन मानकर, अमोल चापले, रवी तोराम व इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते.
महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवर हे गाव असल्याने आणि राज्यपालांचे दत्तक घेतले गाव तथा राजभवन अनेक कार्यासासाठी खरेतर मोठी पर्वणीच आहे. आता या भवनात ग्राम ग्रंथालय मुळे इथला तरुण हा पुस्तकाच्या सानिध्यात येईल व त्यातून पुढे एखादा अधिकारी, राजकीय, सामाजिक, समाजसेवक सुध्दा घडेल. उत्तम सुविधा असलेले हे सुसज्ज ग्राम ग्रंथालय भविष्याच्या दृष्टीने गावासाठी एक वरदान ठरेल अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.