Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तिन अल्पवयीन मुलींना अवघ्या १२ तासांचे आत पोलिसांनी घेतले ताब्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तिन अल्पवयीन मुलींना अवघ्या १२ तासांचे आत पोलिसांनी घेतले ताब्यात  कोणताही तांत्रीक पुरावा नसतांना हिंगणघाट येथून मुलींना आणण्यात पोलिसांना ...
  • तिन अल्पवयीन मुलींना अवघ्या १२ तासांचे आत पोलिसांनी घेतले ताब्यात 
  • कोणताही तांत्रीक पुरावा नसतांना हिंगणघाट येथून मुलींना आणण्यात पोलिसांना यश
  • गडचांदूर पोलिसांची यशस्वी कामगिरी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
पोलीस स्टेशन गडचांदुर येथे एका इसमाने फिर्याद नोंदविली कि, दि. ७ जून रोजी फिर्यादी यांची तसेच त्यांचे मेव्हने व नातेवाईक अशा तिन १४ ते १७ वर्षाच्या अल्पवयीन मुली फिर्यादी हे बाहेरगावी कामानिमीत्य गेले असतांना तिनही मुली घरी कोणालाही काहीही न सांगता घरात ठेवलेले नगदी ४५ हजार रुपये घेऊन निघून गेल्या. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गडचांदूर येथे अज्ञात ईसमा विरुध्द कलम ३६३ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून तपास करण्यात आला. 
पोलीस स्टेशन गडचांदूर मधील अधिकारी, अंमलदार यांनी यांनी जलदगतीने कर्तव्य तत्परता दाखवून कोणताही तांत्रीक बाबीचा पुरावा नसतांना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासाचे आत मुलींचा शोध लावुन तीनही मुलींना हिंगणघाट जि. वर्धा येथील बस स्थानकावरून सुखरुप ताब्यात घेतले व होणारा अनर्थ टाळला. तिन्ही मुलींना गडचांदुर येथे परत घेऊन येऊन पोलिसांनी पालकांचे ताब्यात दिले. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले ठाणेदार, सपोनि प्रमोद शिंदे, नापोशि धर्मराज मुंडे, पोशि विजय कोटनाके, तिरूपती माने, संदीप थेरे, महिला पोलीस प्राजक्ता कन्नाके यांनी केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top