रोटरी क्लब ऑफ हिराई चंद्रपूरचे पदाधिकारी उपस्थित
अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे अधिकारी यांच्या सहभागाने भेटीचे आयोजन
इंटीग्रेटेड वॉटरशेड प्रोग्रॅमची पाहणी, ग्राम वाचनालयाला 50 पुस्तके भेट देणार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, गावकऱ्याची नियमित सकाळी 4:30 वाजता श्रमदानातून स्वच्छता, गावाच्या मध्यभागी कोंडवाडयातून रुपांतर केलेले सार्वजनिक वाचनालय. सुंदर शालेय परिसर, शालेय परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली व्यायामशाळा तसेच सर्व धर्मीय संस्कृतीचे संरक्षण, कोवीड-19 लसीकरण 100 टक्के करणारी ग्रामपंचायत तसेच सन 2021-2022 या वर्षातील आर. आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त करणारी स्मार्ट ग्रामपंचायत मंगी (बु) म्हणून ओळख आहे. अशा विविध उपक्रामाची स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथील सातत्याने चालणाऱ्या श्रमदानाची व विकास कामाची पाहणी करण्यासाठी अंबुजा सिमेंट कंपनीचे यांचे सहकार्याने आयोजित रोटरी इंटरनॅशन डिस्ट्रीक्ट 3030 इंडिया, रोटरी क्लब ऑफ हिराई, चंद्रपूर चमू भेट दिली. याप्रसंगी स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रोटरी इंटरनॅशन डिस्ट्रीक्ट 3030 इंडियाचे गव्हर्नर रो.रमेश मेहेर, पास्ट गव्हर्नर रो.महेश मोकळकर, असिस्टंट गवर्नर रो.स्मिता ठाकरे, रोटरी क्लब ऑफ हिराई चंद्रपूरचे रो. डॉ. रजनीताई हजारे, रो. किर्ती चांदे, रो. जयश्री यमसनवार, अध्यक्ष डॉ. प्रणाली कोल्हेकर, सचिव रुपाली धांडे, कोषाध्यक्ष भारती हजारे, हेमंत कुळकर्णी, विरेंद्र हजारे, महेश उचके, सचिन गंगरेडडीवार, अचल येमसनवार, आरती मोकळकर राम चांदे तसेच या चमूसोबत अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांतजी कुंभारे तथा इंजिनीअर चंद्रकांत धानोरकर तथा सरोज अंबागडे आणि ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, माजी उपसरपंच वासुदेव चापले, ग्रामपंचायतचे सचिव गजानन वंजारे, शंकरभाऊ तोडासे, गणपत कोडापे यांचे उपस्थितीत मान्यवरांचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले आणि रोटरी क्लब ऑफ हिराई चंद्रपूर यांचेकडून रोट्रीयन चमूंचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावाची पाहाणी करण्यात आली.
या प्रसंगी ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला हे सविस्तरपणे सांगितले. ग्रामभेटीतून स्वच्छता पाहून मान्यवर चमू भाराहून गेले. यानंतर संपूर्ण गावाची पाहणी करण्यात आली. तसेच ऑक्सिजन पार्क मध्ये 9000 वृक्षांचे वृक्षारोपन व संवर्धन, नाला खोलीकरण, शेततळे व सामुहिक विहीरी इत्यादी कामाची पाहणी केली. पाहणी करताना दृष्यस्वरुपात गावातील नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, सुंदर व मनमोहक बगीचा, सौंदर्यात्मक प्रवेशव्दार, गावाची सातत्याने होणारी स्वच्छता, गावाच्या बाहेरील रोडची श्रमदानातून होणारी स्वच्छता, स्वच्छ शालेय परिसराची पाहणी केली. मंगी (बु) हे गाव शाश्वत विकासाचे नाविण्यपूर्ण मॉडेल असल्याचे रोट्रीयन चमूनी मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर भेंडे यांनी केले तर आभार किशोर हजारे यानी मानले. यासाठी गावातील नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, रोजगारसेवक दिनेश राठोड, सुरेश येमुलवार तथा संगीता रोहणे, स्वाती येमुलवार, विना आडे, भाग्यश्री मरस्कोल्हे, रंजना घुगुल, अनुसयाबाई कुळसंगे व फुलाबाई सिडाम यांनी मोलाचे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.