Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सिरोंचा वनविभागाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक पर्यावरण दिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सिरोंचा वनविभागाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक पर्यावरण दिन साजरा आमचा विदर्भ -ब्युरो रिपोर्ट्स सिरोंचा - जागतिक पर्यावरण दिनानिम...
  • सिरोंचा वनविभागाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक पर्यावरण दिन साजरा
आमचा विदर्भ -ब्युरो रिपोर्ट्स
सिरोंचा -
जागतिक पर्यावरण दिनानिमित्याने सिरोंचा वनविभाग अंतर्गत बामणी, झिंगानर. आसरअल्ली व सिरोंचा वनपरिक्षेत्र कार्यालयातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांची सकाळी 6.00 वाजता 5 किमी धावणे (महिला व पुरुष), 5 किमी चालणे (45 वर्षावरील) या स्पर्धेला विभागीय कार्यालयापासून उपवनसंरक्षक यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. जैव विविधता उद्यान, सिरोंचा जवळ स्पर्धेचा शेवट केल्यानंतर महिला गटातून कु.सिमा सिडाम, वनरक्षक तसेच पुरुष गटातन मल्लेश तलांडी, वनरक्षक तसेच 45 वर्षावरील कर्मचारी गटातून नागोराव सिडाम, वनरक्षक यांनी पाहिला क्रमांक पटकाविल्याबाबत उपवनसंरक्षक यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपवनसंरक्षक, सिरोंचा यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व तसेच समाजाकरीता वनविभागाचे जबाबदारी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर जैवविविधता उद्यानापासून एकता चौक, पोलीस स्टेशन, वनपरिक्षेत्र कार्यालय, सिरोंचा, नेहरु चौक, बसस्टॉप मार्गे विभागीय कार्यालय, सिरोंचा इथपर्यंत दुचाकी रॅली काढून पर्यावरणाचे महत्व, संरक्षण व संवर्धन याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर विभागीय कार्यालय परिसरातील सभागृहात महिला वन कर्मचारी करीता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ह्या कार्याकरीता उपवनरक्षक, सिरोंचा कु. पुनम पाटे यांचे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, सिरोंचा एस.एम.कटकू व वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम.पझारे तसेच पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच विभागीय व परिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मोलाचे सहकार्य केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top