Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आंगणात ठेवलेले अल्युमिनियम तारांचे बंडल अज्ञात चोरटयांनी केले लंपास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आंगणात ठेवलेले अल्युमिनियम तारांचे बंडल अज्ञात चोरटयांनी केले लंपास बामणवाडा MIDC विद्युतीकरणाकरिता ठेकेदाराने आणले होते साहित्य आमचा विदर्भ...
  • आंगणात ठेवलेले अल्युमिनियम तारांचे बंडल अज्ञात चोरटयांनी केले लंपास
  • बामणवाडा MIDC विद्युतीकरणाकरिता ठेकेदाराने आणले होते साहित्य
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा - 
बामणवाडा MIDC विद्युतीकरणाकरिता आणलेले अल्युमिनियम तारांचे तीन बंडल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना उघडीस आली आहे. नागपूर येथील ठेकेदार निलेश पिंगळे यांनी पोलिसात तक्रार दिली कि, बामणवाडा MIDC विद्युतीकरणाचे कार्य सुरु असल्याने पंधरा दिवसापूर्वी त्यांनी बामणवाडा येथील घर किरायाने घेतले होते. घरातील अंगणात त्यांनी तीन अल्युमिनियम तारांचे बंडल व लोखंडी तारांचे पाच बंडल ठेवले होते. मात्र रात्री कुणीतरी अज्ञात चोरटयांनी १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे तारांचे बांदल चोरून नेले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि १८६०, ३७९ गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top