Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चालत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चालत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी चंद्रपूर -  माजरी-भांदक रेल्वे मार्गावर डाउन लाईनवर...
  • चालत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ जिल्हा विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर - 
माजरी-भांदक रेल्वे मार्गावर डाउन लाईनवर एका अंदाजे २६ वर्षीय एका युवकाचा रेल्वे एक्सप्रेस गाडीने खाली पडून मृत्य झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक लिखेशकुमार चौधरी, रा. कटियार, जिल्हा बिहार हा आपल्या कुटुंबीयासह दानापुर-सिकंदराबाद या ट्रेनने सिकंदराबाद येथे जात होता. सदर युवक धावत्या ट्रेन मधून खाली पडला. दरम्यान त्याच ट्रेनमध्ये यात्रा करणारे काही नागरिकांनी चैन ओढुन ट्रेन थांबविली. सदर ट्रेन माजरी जंक्शनवर थांबल्याने स्टेशन मास्टर यानी ट्रेन थांबल्याचे नेमके कारण काय याची चौकशी करण्याकरिता रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचना केली. चौकशीदरम्यान माजरी-भांदक डाउन लाईन मार्गावर पोल क्र. ८४१/२८-३० च्या दरम्यान एक युवक गंभीर जख्मी अवस्थेत पडून असल्याची निदर्शनास आला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला रेल्वे लाइनवरुन काढून बाजूला केले. सदर युवकाला गंभीर दुखापत झाल्याने काही क्षणातच त्याचा मृत्यु झाला. सदर ट्रेन माजरी जंक्शनवर तब्बल ४० मिनट उभी होती. दरम्यान स्टेशन मास्टर यानी या घटनेची माहिती रेल्वे पोलिस, जीआरपीएफ पोलिसांना दिली. दरम्यान रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता. सदर युवक एक्सप्रेस गाडीने खाली पडल्याने त्याच्या डोक्यावर जबर मार लागला.  अंगात काळ्या-पांढऱ्या रंगाचे चेक्स शर्ट, निळ्या रंगाचे जीन्स पॅन्ट या वर्णनाचा युवक दानापुर-सिकंदराबाद या एक्सप्रेस गाडीने खाली पडून मृत्यू झाल्यावरून सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढिल तपास रेल्वे पोलीस वरोरा व बल्लारशाहचे जीआरपी करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top