आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा वनपरिक्षेत्रा अंतर्गत शहरातील सोमनाथपुर वार्ड भागात सोमेश्वर मंदिराजवळ सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान एक माकडाचे पिल्ल गडव्यात (लोटयात) तोंड अडकलेल्या स्थितीत जिवाच्या आकांताने इकडून-तिकडे पळत असल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी नव्याने रूजु झालेल वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांना भ्रमणध्वनी वरून दिली. तेव्हा लागलीच स्थानिक कर्मचारी यांना सोबत घेवुन त्यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन राजुरा परिक्षेत्रातील सर्व क्षेत्र सहाय्यक व वनरक्षक यांना घेऊन घटना स्थळावर बोलवुन त्या माकडाच्या पिल्ल्याला ताब्यात घेण्याकरीता पिंजरा, जाळी, तसेच खाद्यान वापरुन प्रयत्न केले परंतु माकडाचा कळप तो आईसोबत असल्याने शहरी परिसरात त्याला ताब्यात घेणे सहज शक्य नव्हते.
सदर घटनेची माहिती चंद्रपुर मध्य चांदा वनविभाग उपवनसंरक्षक श्वेता बोड्ड मॅडम, सहाय्यक वनसंरक्षक राजुरा यांना देण्यात आली. त्यांचे मार्गदर्शनात RRT-TATR चंद्रपुर येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे व चमु तसचे RRU कोठारीचे वनपाल बि.के.पेंदोर व त्यांचे चमु यांना बोलविण्यात आले. घटनास्थळावर वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांचे मार्गदर्शनात सदर माकडाच्या पिल्ल्यास किमान साडे सहा तासाच्या अथक परिश्रमा नंतर ताब्यात घेतले. पिल्ल्याच्या चेहऱ्यावर अडकलेला तांबा (लोटा) कापून काढण्यात आला त्यानंतर सदर माकडाच्या पिल्ल्याची प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचार करून सुदृढ असल्याची खात्री केली व त्याच्या आईसोबत निसर्गमुक्त करण्यात आले. या दरम्यान प्राणीमित्र बलवंत ठाकरे व विजय पचारे यांचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.