Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बेघरांना मिळतो मनपाच्या निवारागृहाचा आश्रय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बेघरांना मिळतो मनपाच्या निवारागृहाचा आश्रय आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी...
  • बेघरांना मिळतो मनपाच्या निवारागृहाचा आश्रय
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास १५ बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.  
नागरी भागातील बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी रात्री सर्वेक्षण करून बेघरांना निवाऱ्यामध्ये आणण्यात येते. रात्रीच्या सुमारास कुणी रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन, बसस्थानकात झोपू नये यासाठी महापालिकेने बेघर निवारा केंद्र सुरू केले आहेत. असे असले तरी अनेक जण या केंद्रापर्यंत येत नाही. त्यामुळे मनपा राष्ट्रीय नागरी उपजीविका कर्मचाऱ्यांनी रात्री बसस्थानक, रेल्वेस्टेशन, उड्डाणपुलांखाली बेघरांचा शोध घेतला. त्यात आढळून आलेल्याना बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.
उघड्यावर झोपतांना कुठल्याही स्वरूपाची हानी होऊ नये याकरीता मनपा प्रशासनातर्फे ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत असुन याअंतर्गत महाकाली मंदिर, उडडाणपुल, शनी मंदिर, फूटपाथवरील बेघर लाभार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद शाळेतील बेघर निवाऱ्यात आणण्यात आले. येथे एकुण १५ बेघर लाभार्थी सध्या निवाऱ्यामध्ये वास्तव्यास आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top