धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
गडचांदूरात सिख समाजाचे गुरू अरविंद देव यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सिख समाजाचे गुरू अरविंद देव यांची आपल्या धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण यावेळी करण्यात आली.
या निमित्याने जुना रोटरी क्लब चौक, पेट्रोल पंप जवळ, रामकृष्ण हॉटेल जवळ समाज बांधवांकडून अल्पोपहार आणि शरबतचे वितरण करण्यात आले. यावेळी गडचांदुर व्यापारी मंडळ व गडचांदुर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हंसराज चौधरी, सरदार परमिंदर सिंह, सरदार जरनैल सिंह, गुरुप्रित सिंह, करण सिह, राजबिर सिंह, इंद्रजित सिंह, मनजीत सिंह, ईशांत सिंह, सन्नी सह शीख बांधवासह शीख समाजाच्या अनेक महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी चना वितरणसाठी विशेष सहकार्य केले. गडचांदुर शहरातील अनेक नागरिकांनी या महाप्रसादचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.