Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कर्जबाजारीमुळे तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कर्जबाजारीमुळे तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा तालुक्यातील मौजा सुमठाणा येथील तरूण शेतकरी अनिल...
  • कर्जबाजारीमुळे तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा सुमठाणा येथील तरूण शेतकरी अनिल गणपत डंभारे वय २९ वर्षे यांनी कर्जबाजारीपणामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे. अनिलवर स्टेट बँक ऑफ हैदराबाद चे १ लाख ५० हजार रुपये कर्ज होते. विशेष म्हणजे वडील आंधळे असल्याने कुटुंबाचा संपूर्ण भार त्याच्याच खांद्यावर होता. मात्र, कर्जबाजारीपणामुळे नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top