Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एक लाखाची लाच घेतांना वनपालास रंगेहात अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एक लाखाची लाच घेतांना वनपालास रंगेहात अटक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - सागवान लाकडाच्या वाहतुकीकरिता लागणारा ठेकेदाराचा निर्गत ...
  • एक लाखाची लाच घेतांना वनपालास रंगेहात अटक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
सागवान लाकडाच्या वाहतुकीकरिता लागणारा ठेकेदाराचा निर्गत परवाना म्हणजे TP देण्यासाठी वनपालाने तक्रारदाराला एक लाख 2 हजारांची लाच मागितली तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले. वनपाल यांना घरी पैसे स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदार हे सिंदेवाही तालुक्यातील मौजा गुंजेवाही येथे राहतात, गावातील शेतकऱ्यांच्या शेतात कटिंग केलेले सागवान लाकूड वाहतूक करण्यासाठी TP ची गरज असल्याने उपक्षेत्र पाथरी येथील वनपाल वासुदेव लहानुजी कोडापे यांचेकडे अर्ज केला, मात्र कोडापे यांनी तक्रारदाराला TP देण्यासाठी एक लाख 2 हजार रुपये द्यावे लागेल असे म्हणत सरळ त्यांना लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले. पैसे देण्याची तक्रारदाराला इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी सम्पर्क साधला व त्यांना तक्रार दिली. प्रकरणाची पडताळणी केल्यावर लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी 3 जून ला स्टाफ सह सापळा रचला. तक्रारदाराला वनपाल कोडापे यांनी पैसे घेऊन घरी बोलावले, शासकीय निवासस्थानी वनपाल एक लाख रुपये स्वतः स्वीकारत असताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने कोडापे यांना रंगेहात अटक केली. 
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, रमेश दुपारे, नरेश नन्नावरे, रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यांनी यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top