Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आयशरच्या धडकेत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयशरच्या धडकेत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू अतिक्रमणमुळे अरुंद होत चाललेले रस्ते अपघातास कारणीभूत आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स रा...
  • आयशरच्या धडकेत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
  • अतिक्रमणमुळे अरुंद होत चाललेले रस्ते अपघातास कारणीभूत
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून मुख्य मार्गावर रस्त्याच्या दोन्हीकडे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. दररोज अपघाताच्या छिटपूट घटना घडीत असून शुक्रवारच्या सायंकाळी 6:40 वाजताच्या सुमारास राजुरा येथील तहसील कार्यालयाजवळील टर्निंगवर बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस कर्मचारी मोनल विलास बनकर (मेश्राम) वय 39 वर्षे ह्या आपल्या दुचाकीने येत असताना मागून येणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच दुःखद मृत्यू झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार महिला पोलिस मोनल बनकर ह्या आपले कर्तव्य बजावून MH34 AT1877 क्रमांकाच्या मॅस्ट्रो दुचाकीने बल्लारपूर येथुन राजुरा येथे आपल्या राहत्या घरी परत येत असताना मागाहून येणाऱ्या MH29 BE4158 क्रमांकाच्या आयशर ट्रक ने त्यांच्या गाडीला धडक दिली. धडक बसताच त्या आपल्या मॅस्ट्रो दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्या खाली कोसळल्या व डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात महावितरण विभागात कार्यरत पती विलास बनकर व दोन लहान मुले आहेत. पोलिसांनी वाहनचालका विरोधात भादंवि 1860, 279, 304-A, 134B अन्वये गुन्हा दाखल केला असून आयशर चालक महेश भाऊराव गाठे वय 39 वर्षे यास अटक केली आहे. समोरील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या नेतृत्वात पीएसआय गेडाम करीत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top