- शिवसैनिकांनी बबन उरकुडे यांच्या वाढदिवस रक्तदान करत केला साजरा
- 63 शिवसैनिकांनी केले रक्तदान ; ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने वेधले लक्ष
- गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे - बबन उरकुडे
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शिवसेना राजुरा विधानसभेचे नेते बबन उरकुडे यांच्या वाढदिवसा निमित्य शिवसेना तालुका राजुरा तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात शिवसेनेला ग्रामीण भागात रुजवणारे, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हाप्रमुख ते आता विधानसभा समन्वयक असा प्रवास करत ग्रामीण क्षेत्रातून आलेले बबन उरकुडे हे आता सर्वसामान्यांचे नेते बनले आहे.
बबन उरकुडे यांनी शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात विधानसभेची सूत्र हातात घेतल्यापासून विविध विषयाला हाताशी घेऊन संघर्ष करत आपला जनाधार वाढवला. शिवसेनेच्या 20% राजकारण आणि 80% समाजकारण या सूत्राला न्याय देत प्रकल्प ग्रस्थ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या वीज बिल संदर्भातल्या मागण्या, ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांच्या तहसील, पोलीस स्टेशनच्या समस्या, गरजू कुटुंबाना आर्थिक मदत, कोरोना काळात विविध उपक्रम अश्या अनेक कामांसह सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी आपले नाव कोरले. त्यांच्या या कामाची दखल विरोधक सुद्धा घेतात हे विशेष.
शिवसेने नेते बबनभाऊ उरकुडे यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी रक्तदान करत साजरा केला. याप्रसंगी 63 शिवसैनिकांनी रक्तदान करून सामाजिक कार्य घडवून आणले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी बबन उरकुडे याना केक भरवत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव चापले, शहर प्रमुख निलेश गंपावार, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुका समन्वयक साहिल देवगडे, गोवरी पंस विभाग प्रमुख अमोल कोसुलकर, शहर समन्वयक बबलु चव्हान, सास्ती पंस विभाग प्रमुख बबलु कुशवाह, सास्ती-गोवरी जिप गट सर्कल प्रमूख संदिप वैरागडे, भुमन सल्लम, बाबू येलकला, सिद्धू जंजलावार, सुनील पासला, पंकज कोटा, अजय देशमुख, जानी जंजराला, राधे भोगा, मुरली भोगा, रणजित उगे, तिरुपती कायम, गणेश चोथले, उपतालूका प्रमूख रोहित जगेटी युवासेना, रोहित नलके, शिवम नलके, प्रवीण पेटकर, आशिष वैरागडे, प्रफुल मदासवार, लक्खा, अमर बोडे, अभिजित दासरी, शशांक जांजरला,अजय शकीनाला, स्वप्नील मोहुरले, नरेश कोपुल्ला, नीरज जंजरला, गोवरी सेवा सहकारी पत संस्था अध्यक्ष नागेश्वर ठेंगणे, अविनाश जेनेकर, महिला आघाडी कडून सरपंच आशा उरकुडे, ज्योतिताई नळे, वर्षा पंदिलवार, सुनीता जमदाळे, जमदाले व शेकडो कार्यकर्ता व मित्रमंडळी उपस्थित होते. सर्वानी बबन उरकुडे यांना वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.