Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: केदारनाथ - महिन्यात १४ लाख भाविकांनी घेतले दर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केदारनाथ - महिन्यात १४ लाख भाविकांनी घेतले दर्शन डेहराडून (वृत्तसंस्था) - चारधाम यात्रेत या वेळी भाविकांचे मागील सर्व विक्रम मोडीत निघत आहेत...
  • केदारनाथ - महिन्यात १४ लाख भाविकांनी घेतले दर्शन
डेहराडून (वृत्तसंस्था) -
चारधाम यात्रेत या वेळी भाविकांचे मागील सर्व विक्रम मोडीत निघत आहेत. एका महिन्यात १४ लाखांपेक्षा जास्त भाविक पोहोचले आहेत. ७ महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत ३४ लाख भाविकांचा विक्रम आहे. २०१९ मध्ये तो झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षांपर्यंत केवळ सांकेतिक यात्रा झाली होती. ही यात्रा ऑक्टोबरपर्यंत चालते. पहिल्यांदाच केदारनाथ धामच्या रस्त्यात पायी जाणाऱ्या यात्रेकरूंचाही जाम झाला आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम यात्रेच्या नोंदणीसाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे, अनेक लोकांना धामांवर थांबण्यासाठी हॉटेल वा होमस्टेत बुकिंग मिळत नाही. प्रशासनाने आधीच स्पष्ट केले आहे की, राहण्याची व्यवस्था होत नसेल तर यात्रा टाळली पाहिजे. त्यामुळे यात्रेतील संभाव्य त्रास होणार नाही. उत्तराखंडचे पर्यटन सचिव दिलीप जवळकर यांनी सांगितले की, या वेळी यात्रेकरूंचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. चारधाम, हेमकुंडमध्ये यात्रेकरूंनी घेतलेले दर्शन केदारनाथ ४,५२,५६७, बद्रीनाथ ४,८७,५३२, गंगोत्री २,६१,८६१ यमुनोत्री १,९३,९५३, हेमकुंडसाहिब २०,७७५, एकूण १४,१६,६८८ भाविकांनी भेट दिली. ऋषिकेशहून चारधामसाठी रोज हजारो वाहनांतून सुमारे ५० हजार यात्रेकरू रवाना होत आहेत. यामुळे दोन वर्षांपासून बेरोजगारीच्या झळा सोसणाऱ्या हजारो चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. उत्तराखंड पर्यटन विभागानुसार, यात्रा मार्गावर ५ हजारांपेक्षा जास्त व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. यात ढाबे, हॉटेल, होम स्टे, डिपार्टमेंटल स्टोअर, मेकॅनिक आदी असतात. एकूण ३० हजार लोकांना रोजगार मिळतो. कोरोनामुळे दोन वर्षांत हे सर्व ठप्प होते. काही कुटुंबे मूळ गाव सोडून शहरांत मजुरी करण्यासाठी आली होती. आता ती परतली आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top