Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने नम्रता ठेमस्कर यांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने नम्रता ठेमस्कर यांचा सत्कार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - चंद्रपूर काँग्रेसच्या नवनियुक्त ग्रामीण ...
  • राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने नम्रता ठेमस्कर यांचा सत्कार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
चंद्रपूर काँग्रेसच्या नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी आमदार सुभाष धोटे यांची आज सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, त्यांच्या या निवडीमुळे महिला काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असून काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल. 
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी जिप सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती निर्मला कुडमेथे, पुनम गिरसावळे, रेखाताई बोढे, शुभांगी खामनकर, पुष्पवर्षा जुलमे यासह अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top