Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्री शिवाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री शिवाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे...
श्री शिवाजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना तथा पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, किसान सेवा समिती, भारत स्वाभिमान, युवा–युवती संघटना यांच्या द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त योगा अभ्यास घेण्यात आला व त्याचे फायदे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ योगा अभ्यासक अँड. मुर्लीधरराव धोटे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार वामनराव चटप, सुदर्शन निमकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि, आरोग्यासाठी, मानवतेसाठी योग अभ्यास गरजेचे आहे. आपण पैशाने संपत्ती मिळवू शकतो, पण आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर योगा अभ्यास करणे, आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. त्यातून मानवतेचा संदेश लोकांपर्यंत जायला हवा. आपल्या जीवनाचा एक भाग बनला पाहिजे. असा मौलिक संदेश आपल्या मनोगतातून देतात. या प्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव यांनी आपल्या संदेशात सांगितले कि, कोरोना काळामध्ये लोकांना योगा अभ्यास करायला शिकविले, ज्याप्रमाणे अभ्यास न करता परिक्षेला जाणारा विद्यार्थी परिक्षेपासून घाबरतो, त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचे आरोग्य बरोबर नसेल तर झोपतांना नेहमी त्याला वाटते की, माझ्या छातीमध्ये दु:खेल का, मला झोप येईल का आणि या सर्व बाबी टाळायच्या असेल तर योग्य अभ्यास, खानपान या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांनी आरोग्य योग मधून मानवतेचा संदेश जायला हवा असे सांगितले. 
यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष साजिद हुसेन बियाबानी, माजी बार असोसिएशन अध्यक्ष अँड. अरूण धोटे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवार, तालुका प्रभारी किसान सेवा समिती सत्यपाल साळवे, तालुका प्रभारी युवा पतंजली योग समिती, प्रा. देविदास कुईटे, माजी अध्यक्ष व्यापारी असोसिएशन, सतिश धोटे, डॉ. भाग्यश्री जिभकाटे, डॉ. सारीका साबळे, डॉ. आनंद रायपुरे, कार्यक्रमाचे संचालन डॉ. आर आर. खेरानी यांनी योग अभ्यास केला. योग्य अभ्यास प्रा. हरिभाऊ डोर्लीकर, कार्यकारी अध्यक्ष योग समिती तसेच पुंडलिक उराडे, तालुका प्रभारी, भारत स्वाभिमान संघटना, एम.के. सेलोटे, जिल्हा सहप्रभारी, भारत स्वाभिमान तालका प्रभारी, पतंजली योग समिती यांच्या द्वारे घेण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील, महाविद्यलयातील प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी. कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top