Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राज्यात चालविणाऱ्या जेष्ठ नागरीकांच्या हेल्पलाईन बद्दल टेंबुरवाही येथे मार्गदर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राज्यात चालविणाऱ्या जेष्ठ नागरीकांच्या हेल्पलाईन बद्दल टेंबुरवाही येथे मार्गदर्शन  आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - देशातील जेष्ठ नाग...
राज्यात चालविणाऱ्या जेष्ठ नागरीकांच्या हेल्पलाईन बद्दल टेंबुरवाही येथे मार्गदर्शन 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
देशातील जेष्ठ नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईन बद्दल सर्व जेष्ठांना माहिती व्हावी व त्याचा लाभ घेता यावा याकरीता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन राजुरा तालुक्यातील टेंबुरवाही येथे जेष्ठ नागरीक संघ राजुराच्या वतीने करण्यात आले होते. गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृद्धांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोेंदविली गेली. सध्या देशात 13 कोटीहून अधिक लोकसंख्या 60 वर्षापेक्षा जास्त वयाची आहे. या सर्व वृद्धांच्या समस्यां व अडचणीमध्येही वाढ झालेली असून त्यांचे निराकरण करण्याकरीता सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात जेष्ठ नागरीकांची राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन पुणे तर्फे चालविण्यात येत आहे. 1 आगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या या हेल्पलाईनचा लाभ जेष्ठ नागरीकांना व्हावा याकरीता मार्गदर्शन शिबीराचे आयेाजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी वनवौभव प्रादेशिक संघ तथा जेष्ठ नागरीक संघ चंद्रपूर-गडचिरोली चे उपाध्यक्ष कांशीराम मनगटे जेष्ठ नागरीक संघ राजुराचे‌ सचिव सुदर्शन दाचेवार, कार्यकारीणी सदस्य रामचंद्र मुसळे. जनसेवा फाऊंडेशनचे फिल्ड रिस्पॉन्स ऑफीसर कपील राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी जनसेवा फाऊंडेशनचे कपील राऊत यांनी राज्यात चालविण्यात येणाऱ्या जेष्ठ नागरीकांची राष्ट्रीय हेल्पलाईनबद्दल मार्गदर्शन करीत जेष्ठांनी आपल्या समस्या, अडचणी चे निवारणाकरीता हेल्पलाईन क्रमांक 14567 चा वापर करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जेष्ठ नागरीक अर्जुन अलगमक, सुधाकर अमृतकर, गुणवंत कुळसंगे, विट्ठल गाढवे, भिमराव कुळसंगे, संबुजी गेडाम, वारलू कुळसंगे, नरसिंग कुळसंगे, भिमा कुळसंगे, भिवाजी निमकर, सदाशिव मोहूर्ले, मारोती बावणे, मारोती इटनकर, सिताबाई बोबडे, सखुबाई अमृतकर, बयनाबाई मडावी, जिजाबाई अलगमकर, पार्वताबाई कुळसंगे, विना कुळसंगे सह जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top