Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथील रेल्‍वे प्‍लॅटफार्मवर पादचारी पुलाचे बांधकाम करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथील रेल्‍वे प्‍लॅटफार्मवर पादचारी पुलाचे बांधकाम करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी शशी ठक्कर - आमचा ...
बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथील रेल्‍वे प्‍लॅटफार्मवर पादचारी पुलाचे बांधकाम करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर येथील रेल्‍वे प्‍लॅटफार्मवर पादचारी पुलाचे बांधकाम करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्‍णव आणि रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे यांच्‍याकडे केली आहे.
बल्‍लारपूर तालुक्‍यातील विसापूर हे चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वाचे व मोठे ग्राम पंचायत क्षेत्र आहे. याठिकाणी रेल्‍वे थांबा व रेल्‍वे प्‍लॅटफार्म उपलब्‍ध असून त्‍याठिकाणी पादचारी पुलाची नितांत आवश्‍यकता आहे. या स्‍टेशनवर बल्‍लारपूर-वर्धा, वर्धा-बल्‍लारपूर, काजीपेठ-नागपूर, नागपूर-काजीपेठ, गोंदिया-बल्‍लारपूर-गोंदिया या रेल्‍वे गाडयांचा थांबा आहे. तिस-या व चौथ्‍या प्‍लॅटफार्मवर जाण्‍यासाठी रेल्‍वेलाईन ओलांडून जावे लागते. विशेष म्‍हणजे रेल्‍वेलाईन व रेल्‍वे स्‍टेशन गावाच्‍या मध्‍यभागी आहे. त्‍यामुळे नागरिकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्‍यामुळे या ठिकाणी पादचारी पुलाचे बांधकाम करणे प्रवाश्‍यांच्‍या सोईच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत गरजेचे आहे, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्‍वेमंत्री व रेल्‍वे राज्‍यमंत्री तसेच रेल्‍वे प्रशासनाला पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे. लवकरच रेल्‍वे बोर्डाचे सदस्‍य या भागात पाहणी दौ-यासाठी येणार असून सदर बाब त्‍यांच्‍या निदर्शनास आणली जाईल, असेही आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top