हत्या की आत्महत्या? चर्चेला उधाण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव तथा निवृत्त पोलीस अधिकारी एकनाथ कन्नाके यांच्या मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर-बल्हारपूर मार्गावरील अब्दुल कलाम गार्डनचा मागील भागात त्यांचा मृतदेह आढळला. ही हत्या की आत्महत्या? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र हसमुख, प्रेमळ स्वभावाचा राजकारणी हरपल्याने राजकीय वर्तुळात दुख व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निवृत्त पोलीस अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव एकनाथ कन्नाके हे हसमुख आणि प्रेमळ स्वभावाचे धनी होते. आदिवासी समाजाचे नेते ही त्यांची खरी ओळख होती. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारण आणि समाजसेवेवर अधिक भर दिला होता. आज चंद्रपूर-बल्लापूर मार्गावरील अब्दुल कलाम गार्डनचा मागे त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.