Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सागवान लाकडासह दोन चारचाकी वाहन जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सागवान लाकडासह दोन चारचाकी वाहन जप्त वन विभागाची मोठी कारवाई आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क सिरोंचा - वन विभागातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप...
सागवान लाकडासह दोन चारचाकी वाहन जप्त
वन विभागाची मोठी कारवाई
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
सिरोंचा -
वन विभागातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाने 28 जून 2022 रोजी गस्ती दरम्यान मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास वाहन क्रमांक MH12 DJ3069 हे वाहन चिंतलपल्ली नाक्यावर आले असता सदर वाहनाला थांबवून नाक्यावर तैनात वनकर्मचारी वाहनाचा मागे तपासणी करण्याकरिता गेले असता वाहन चालकाने वाहन पलटवून परत धर्मपुरी नाक्याकडे निघाला. वाहन चालक पळ काढतोय हे लक्षात येताच नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सदर वाहनाचा पाठलाग करत गस्तीवरील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. 
गस्तीवरील कर्मचाऱ्यांना पाहून सदर वाहनातील वाहन चालक वाहन उभे करून समोर उभे असलेल्या वाहन क्रमांक TS-19/2347 मध्ये बसून फरार झाले. वन कर्मचाऱ्यांनी सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनात एकूण 8 नग साग लाकडे दिसुन आले. त्यानंतर गस्तीवरील अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय वाहनाने वाहन क्रमांक TS-19/2347 चा पाठलाग केले असता सदर वाहन चिंतरेवला गावात उभे करुन वाहनावरील सर्व आरोपी फरार झाले तेव्हा सदर वाहन ताब्यात घेवून ट्रॅक्टरद्वारे टोचन करुन वनपरिक्षेत्र कार्यालय सिरोंचा येथे आणण्यात आले. तेव्हा मोक्यावर जप्तीनामा, पंचनामा नोंद करुन एकुण साग नग 8, घनमीटर 0.901, रक्कम 65082/- व वाहनाची किंमत 1500000/- असे एकुण 1565082/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहन ताब्यात घेवून वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय, सिरोंचा येथे आणुन वनगुन्हा क्रमांक 08560/04/2022, दि. 28/06/2022 अन्वये भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26(1), 41, 42(2) व 52 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 
सदरची कारवाई उपवनसंरक्षक सिरोंचा पुनम पाटे (भावसे) यांचे मार्गदर्शनात सिरोंचा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास म. कटकू यांच्या नेतृत्वात  वनपाल आर.व्ही. जवाजी, ए.एच.गहाणे, वनरक्षक आर.वाय. तलांडी, आर.एल.आत्राम, सुनिल कप्पलवार, सारय्या संगेम, दुर्गेश जानकी यांनी केली. पुढील तपास क्षेत्र सहाय्यक ए.एच.गहाणे करीत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top