Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महावितरणचा "त्या" लाचखोर अभियंत्याला एक दिवसाची पोलीस कोठडी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महावितरणचा "त्या" लाचखोर अभियंत्याला एक दिवसाची पोलीस कोठडी डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी वरोरा - वरोरा तालुक्यातील महाराष...
महावितरणचा "त्या" लाचखोर अभियंत्याला एक दिवसाची पोलीस कोठडी
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वरोरा -
वरोरा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे सहायक अभियंता श्रीणू चुक्का यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात सोमवारी पकडले होते. काल रात्रीपर्यंत चाललेल्या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक कलम ७ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी बारा वाजताच्या दरम्यान वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागातर्फे पुढील चौकशी सुरु असून या अभियंत्याकडे किती संपत्तीचे विवरण सापडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top