Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महावितरणचा अधिकाऱ्याला सहा हजाराची लाच घेतांना अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महावितरणचा अधिकाऱ्याला सहा हजाराची लाच घेतांना अटक डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी वरोरा - डिमांड काढून देण्यासाठी पैशाची मागणी करण्या...
महावितरणचा अधिकाऱ्याला सहा हजाराची लाच घेतांना अटक
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वरोरा -
डिमांड काढून देण्यासाठी पैशाची मागणी करण्याच्या महावितरणच्या लाचखोर सहायक अभियंत्याला चंद्रपूर लाचलुचपत विभागातर्फे६ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. वरोरा महावितरण शहर कार्यालयातील सहाय्यक अभियंता श्रीणु बाबू चुक्का असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार वरोरा येथील राहवासी असून सोलर सिस्टीम फिटिंग व इलेक्ट्रीशन चे काम करतो. तक्रारदार यांनी ग्राहकांच्या घरी (सोलर सिस्टम) किट लावण्याचे काम घेतले होते. त्यासाठी लागणारे डिमांड काढून देण्याच्या नावाखाली लाचखोर अधिकारी श्रीणु बाबू चुक्का यांनी दिनांक २४ जून रोजी तक्रारदार यांचे कडे ६ हजार रुपयांची मागणी केली. वारंवार होत असलेल्या पैश्याच्या मागणीला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली असता. दि.२७ जून रोजी सापळा रचून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक केली आहे. सदरची कार्यवाही पोलीस उपयुक्त/पोलीस अधीक्षक ला.प्रा.वि नागपूर राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्रा.वि नागपूर मधुकर गीते तसेच पोलीस उपाधीक्षक अविनाश भामरे ला.प्रा.वि चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात शिल्पा भरडे, कार्यालयीन स्टाफ नरेश ननावरे, रवीकुमार ढेंगळे,राकेश जांभुळकर,वैभव गाडगेव चालक सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पडली. सदरच्या कार्यवाहीच्या लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी,कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करत असल्यासलाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top