Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तुटलेल्या पुलाचे पुनःनिर्माण करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तुटलेल्या पुलाचे पुनःनिर्माण करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख यांची मागणी डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चं...
तुटलेल्या पुलाचे पुनःनिर्माण करा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख यांची मागणी
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
प्रभाग क्रमांक 06 बोथली रोड, शहीद अब्दुल हमीद नगर, सवारीच्या बंगला समोरील नालीवरील पुल गेल्या 15-20 दिवासापासून टूटलेला आहे. या तुटलेल्या पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून या पुलावरुन 20 ते 25 कुटुंब ये-जा करीत असतात व लहान मुले तिथेच खेळात असतात मात्र हा अर्धवट पुल केव्हा अचानकपणे पडणार याचे कोणाला भास नसल्याने पुलामुळे कोणता अपघात झाला तर नगरपरिषद प्रशासन जिम्मेदार असेल. यासाठी लवकरात लवकर नवीन पुलाची पुनःनिर्माण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 
यावेळेस शहर अध्यक्ष रियाज शेख, युवक कार्याध्यक्ष सचिन बनकर, महिला तालुका अध्यक्ष निर्मलाताई रेवतक़र, बूथ अध्यक्ष जीतू चौधरी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top