Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आई जिजाऊ अ हेल्पींग हँड ऑर्गनायजेशन तर्फे वृक्षारोपण व वृक्षवाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी आई जिजाऊ अ हेल्पींग हँड ऑर्गनायजेशन तर्फे वृक्षारोपण व वृक्षवाटप डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
आई जिजाऊ अ हेल्पींग हँड ऑर्गनायजेशन तर्फे वृक्षारोपण व वृक्षवाटप
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
घुग्घुस येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्य आई जिजाऊ अ हेल्पींग हँड ऑर्गनायजेशन तर्फे वृक्षारोपण व वृक्ष वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. 
या कार्यक्रमात ऐश्वर्या जैस्वाल पाईकराव यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन प्रणालीवर मनोगत व्यक्त करताना सांगितलं की सर्व प्रथम आरक्षण देणारे शाहु महाराज यांना आरक्षण जनक म्हणून ओळखल्या जाते. शाहु महाराज यांनी गोर-गरिब जनतेसाठी बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी कापड मिल कोल्हापूर येथे तयार केली आणि शिक्षणात प्रत्येक व्यक्ति पुढे येण्यासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण सुद्धा सुरु केले. असे मनोगत ऐश्वर्या जैस्वाल पाईकराव यांनी व्यक्त केले. या जयंती सोहळा मध्ये प्रमुख पाहुने म्हणुन संघमित्राताई सोनटक्के, रमाताई सातारडे, मिनाताई गुडदे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करतांना मार्गदर्शन केले. यानंतर 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी मयुर देशकर, उन्नती भगत, नकुल पाईकराव या लहान मुलांनी सुध्दा सुंदर असे भाषण सादर केले. मुलांनी सुंदरशी नृत्य कला सुद्धा प्रदर्शित केली. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. आभार ललित गाताडे यांनी मानले. 
कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक कृष्णा पाईकराव, अध्यक्ष नागेश पाईकराव, उपाध्यक्ष ललित गाताडे, सचिव ऐश्वर्या जैस्वाल पाईकराव, सहसचिव प्रितम ठेंगणे, आकर्षण गाताडे, सिद्धांत गुडदे, कुणाल कामतवार, अनिकेत नालमवार, अमित घनकसार, स्वप्नील कुंभारे, तुषार गिरटकर, मंजुनाथ मडावी, जय कामतवार, सारंग गाताडे, रवी पाईकराव, छगण गाताडे, अनिल आस्वले, सुरज झाडे, सुरज गाताडे व पालक उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top