Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला अटक आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क पोंभुर्णा - एका २२ वर्षीय युवकाने गावातच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग क...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला अटक
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा -
एका २२ वर्षीय युवकाने गावातच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पोंभुर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोंभुर्णा पोलिसांनी पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिवसेंदिवस महिलांवर तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.अशातच तालुक्यातील पोंभुर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवेगाव मोरे येथील एका अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग केल्याचा प्रकार शनिवारला उघडकीस आला.
प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन मुलगी आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधून गावातील धनराज पुरोषोत्तम पाल (२२) वर्षे यांनी तिच्या घरात घुसून विनयभंग केला हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी धनराज पुरोषोत्तम पाल  याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत भांदवी कलम ३५४,३५४(ड)४५२,५०६, सहकलम ८,१२ लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करुन न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धर्मेंद्र जोशी, राजश्री रामटेके करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top