Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अमेरिकेतील कंपनीत "विजय" ने मिळविले मानाचे पद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अमेरिकेतील कंपनीत "विजय" ने मिळविले मानाचे पद  जजेस ऑफ टेक्निकल' बोर्डात नियुक्ती धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोर...
अमेरिकेतील कंपनीत "विजय" ने मिळविले मानाचे पद 
जजेस ऑफ टेक्निकल' बोर्डात नियुक्ती
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून गाव, तालुका, जिल्हा, राज्यच नव्हे तर देशाची शान वाढवत तो कोरपण्याचा तरुण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. विजय शिरपूरकर असे त्याचे नाव आहे. कोरपना तालुक्यातील कोडशी (बू) चे मूळ रहिवासी आहे. मागील काही वर्षांपासून त्याचे आई वडील व त्यांचे कुटुंबीय कोरपना येथे वास्तव्यास आले आहे. त्याची अमेरिकेतील हायड्रोकार्बन प्रोसेसिंग कंपनीमध्ये जजेस ऑफ टेक्निकल बोर्ड म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. आइल आणि गॅस इंडस्ट्रीज संबंधित नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती या मार्फत उपलब्ध करून दिली जाते. शिरपूरकर हे यापूर्वी सौदी
अरेबिया मध्ये एका कंपनीत तेल आणि वायू क्षेत्रामध्ये संशोधन करून पर्यावरण संवर्धनासाठी मोलाची कामगिरी बजावत होते. तेल आणि वायू विविध घटकांवर त्याचे तेथे संशोधन सुरू असायचे. पेट्रोल-डिझेल पॉलिमर असे अनेक घटक वेगळे करण्यासाठी होणार या प्रक्रियेत मोठे इंधन खर्च होते. हे इंधन वाचल्यास पर्यावरणाला मोठा हातभार लागेल. यासाठी त्यांनी संशोधन केले. यासाठी त्यांना यापूर्वीच गौरविण्यात आले होते. त्यांनी अनेक संशोधन प्रबंध सादर केले आहे. आता त्याची अमेरिकेत हायड्रो प्रोसेसिंग कंपनीत जजेस ऑफ टेक्निकल बोर्ड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिरपूरकर यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच पूर्ण केले. पुढे त्यांनी यवतमाळ येथील पॉलिटेक्निकमध्ये केमिकल इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमा केला. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top