Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नराधमाच्या चिमुकलीवर अत्याचार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नराधमाच्या चिमुकलीवर अत्याचार आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क शंकरपूर -  शंकरपूर येथील एका 36 वर्षीय नराधमाने आठ वर्षीय दुसऱ्या वर्गात शिकत असले...
नराधमाच्या चिमुकलीवर अत्याचार
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
शंकरपूर - 
शंकरपूर येथील एका 36 वर्षीय नराधमाने आठ वर्षीय दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकलीवर शुक्रवारला सायंकाळी चारच्या सुमारास अत्याचार केल्याची घटना घडली. या नराधमाला पकडून पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीचा आजोबा हा शंकरपूर येथील देशी भट्टीवर नाश्त्याची दुकान चालवतो. त्याला लागणारा पक्का माल हा घरून पाठविला जात होता. ही मुलगी आईने उकडून दिलेले अंडे आजोबाकडे नेऊन देण्यासाठी देशीभट्टीवर गेली. तिथे हा नराधम राजीक उर्फ काल्या हा दारू पीत होता. ही मुलगी घरी एकटी जाताना पाहून तो तिच्या मागे दुचाकीने आला व तुला घरी सोडून देतो म्हणून गाडीवर बसवून रस्त्यात असलेल्या राजीव गांधी महाविद्यालयाच्या मागे निर्जनस्थळी घेऊन गेला व तिच्यावर अमानुष अत्याचार केला. याची माहिती घरी जाऊन पीडित मुलीने आपल्या आईला दिली असता मुलीच्या आईने तिला घेऊन पोलिस चौकी गाठण्यासाठी निघाली. वाटेतच हा नराधम तिला रोड वर दिसला. तिने त्याची कॉलर धरून पोलिस चौकीकडे नेत असताना तोफिक पान सेंटर जवळून तिला हिसका मारून त्याने पळ काढला. परंतु तिच्या आईने लगेच पोलिस चौकी गाठन पोलिसांना सर्वकाही हकिगत सांगितली. पोलिसांनी लगेच त्याला पकडून आणून अटक केली व कलम 376 पोस्को व 18 सिटीनुसार गुन्हा दाखल केला. रात्री नऊ वाजताच्या दरम्यान मुलीला तपासणी करता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्यात आले पुढील तपास सपोनि विनोद जांभळे व सहकारी करीत आहेत. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top