Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पावसाळ्यात बाइकची घ्या विशेष काळजी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पावसाळ्यात बाइकची घ्या विशेष काळजी बाइकची सर्व्हिसिंग करून घ्या पावसाळ्यात बाइकचे टायर्स आणि ब्रेक्स सुस्थितीत असणं गरजेचं आमचा विदर्भ - ब्य...
पावसाळ्यात बाइकची घ्या विशेष काळजी
बाइकची सर्व्हिसिंग करून घ्या पावसाळ्यात बाइकचे टायर्स आणि ब्रेक्स सुस्थितीत असणं गरजेचं
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नवी दिल्ली -
पावसाळ्यात बाइक चालवणं थोडं अवघड काम असतं. त्यातच आपल्या देशातल्या अनेक प्रमुख शहरांमधल्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे आपणच आपली काळजी घेत सुरक्षित राईड करणं गरजेचं आहे. असं असलं तरी पावसात बाइक राईड करायला अनेकांना आवडतं. मात्र रस्त्यांवरचं पाणी, खड्डे यामुळे अनेकदा दुचाकी चालकांचा जीव धोक्यात जातो. आपल्या देशात दरवर्षी हजारो लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यात दुचाकी चालक किंवा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात बाइक चालवणं तुम्हाला कितीही आवडत असलं तरी बाइक चालवताना स्वतःची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही मान्सूनमध्ये सुरक्षित राईड करू शकता आणि पावसाची मजासुद्धा घेऊ शकता.

ब्रेक्स आणि टायरची ग्रिप चांगली असायला हवी
पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचतं. त्यामुळे अनेक ठिकाणी बाइक स्लिप होऊन अपघात होतात. अशा वेळी तुमच्या बाइकचे ब्रेक्स आणि टायर्सची ग्रिप चांगली असायला हवी. बाइकचा जास्त वापर केल्यामुळे टायर्स गुळगुळीत होतात. हे टायर्स चांगली ग्रिप देत नाहीत. या बाइक्स रायडिंग दरम्यान, घसरण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे तुमच्या बाइकच्या टायर्सची ग्रिप चांगली असेल याची काळजी घ्या. किंवा जर तुमचे टायर्स गुळगुळीत झाले असतील तर ते आत्ताच बदलून घ्या.

स्पीड कमी असायला हवा, सुरक्षित अंतर ठेवा
काही ठिकाणी रस्ते चांगले असले तरी पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमध्ये पाणी साचलं असेल तर अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या बाइकचा स्पीड कमी असायला हवा. अन्यथा खड्डा पाहूनही तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही. तसेच तुमच्या पुढे चालणाऱ्या वाहनात आणि तुमच्या बाइकमध्ये सुरक्षित अंतर असायला हवं. दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर नसल्याने दररोज अनेक ठिकाणी अपघात होत असतात.

पाणी साचलेल्या रस्त्यांवरुन वाहन चालणं टाळा
जर एखाद्या ठिकाणी खूप पाण साचलं असेल अशा रस्त्यांवरुन बाइक चालवणं टाळा, प्रामुख्याने, नदी, ओढ्यावरील पुलांवर पाणी साचलं असेल तर त्यावरुन बाइक चालवू नका. अशा वेळी अपघाताचा धोका वाढतो. अनेकदा तुम्ही त्यातून मार्ग काढू शकता खरे, मात्र अशा वेळी बाइकच्या इंजिनमध्ये पाणी जाऊ शकतं. त्यामुळे इंजिन खराब होऊ शकतं.

बाइकची सर्व्हिसिंग करून घ्या
तुमच्याकडे कोणतंही वाहन असो, त्या वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं असतं. पावसाळ्याआधीच गाडीची सर्व्हिसिंग करून घेणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही अजून तुमच्या बाइकची सर्व्हिसिंग करून घेतली नसेल तर ती करून घ्या. यामुळे तुमची बाइक चांगला परफॉर्मन्स आणि मायलेज देईलच त्यासोबतच ती भर पावसात, रस्त्यात कुठेही बंद पडणार नाही.

आपल्याला हि माहिती कशी वाटली आपला अभिप्राय नोंदवा, आमचा विदर्भ न्यूज पोर्टलला आताच सबस्क्राईब / फॉलो करा.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top