Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सरपंचावर गोळीबार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सरपंचावर गोळीबार गाडीत असताना अज्ञात इसमाने झाडल्या गोळ्या आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सरपंचावर गोळीबार...
सरपंचावर गोळीबार
गाडीत असताना अज्ञात इसमाने झाडल्या गोळ्या
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
उस्मानाबाद -
उस्मानाबाद जिल्ह्यात सरपंचावर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. 
​मिळालेल्या माहितीनुसार, फक्राबादचे राष्ट्रवादीचे सरपंच नितीन बिक्कड यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात अज्ञातांनी २ गोळ्या झाडल्या आहेत. सुदैवाने ते गाडीच्या आतमध्ये असल्याने सर्वजण जण सुखरूप आहेत. काल रात्री सुमारास ही घटना घडली. वाशी तालुक्यातील पारा फक्राबाद रोडवर गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. वाशी पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोटोमध्ये गाडीच्या काचेवर गोळी झाडल्याचे निशाण आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून नितीन बिक्कड यांना मारण्याचा प्लॅन का आखण्यात आला? आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top