Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पंतप्रधान मोदींनी आईचे धुतले पाय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंतप्रधान मोदींनी आईचे धुतले पाय वाढदिवसानिमित्त आईला भेटण्यासाठी पोहोचले मोदी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स वडोदरा - पंतप्रधान नरेंद्र मोद...
पंतप्रधान मोदींनी आईचे धुतले पाय
वाढदिवसानिमित्त आईला भेटण्यासाठी पोहोचले मोदी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
वडोदरा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आई हीराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदाबादला पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या आईचे पाय धुतले, त्यानंतर डोळ्यांना पाणी लावून आईची पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींच्या आईनेही वाढदिवसानिमित्त भेटायला आलेल्या मुलाचे तोंड गोड केले. पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन आज 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. 

गुजरातमध्ये मातृशक्ती योजनेची सुरुवात
शनिवारी पावागड येथील महाकालीचे दर्शन घेतल्यानंतर मोदी हे हेरिटेज वनातील लोकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर वडोदराला रवाना होणार. तेथे 'गुजरात गौरव अभियान' कार्यक्रमांतर्गत 21 हजार कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विभागांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे. या कार्यक्रमात ते 'मुख्यमंत्री मातृशक्ती योजना' (MMY) लाँच करणार आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top