Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अमरनाथ यात्रेकरिता प्रथमच हेलिकॉप्टर सेवा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अमरनाथ यात्रेकरिता प्रथमच हेलिकॉप्टर सेवा हेलिकॉप्टर सेवेने एका दिवसातच अमरनाथ यात्रा या संकेतस्थळावर करता येईल बुकिंग आमचा विदर्भ - ब्युरो ...
अमरनाथ यात्रेकरिता प्रथमच हेलिकॉप्टर सेवा
हेलिकॉप्टर सेवेने एका दिवसातच अमरनाथ यात्रा
या संकेतस्थळावर करता येईल बुकिंग
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
श्रीनगर -
बाबा बर्फानीच्या भाविकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना श्रीनगरहून पंचतरणीसाठी प्रथमच हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध झाली आहे. यामुळे यात्रेकरू एका दिवसात पवित्र गुहेतील बाबा बर्फानीचे दर्शन घेऊन श्रीनगरला परततील. याआधी केवळ बालटाल आणि नुनवनहून(पहलगाम) पंचतरणीपर्यंतच सेवा उपलब्ध होती. ही आधीसारखीच सुरू राहील. मात्र, पहलगामहून जाणाऱ्यांना परत येण्यासाठी दोन दिवस लागत होते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरुवारी ऑनलाइन हेलिकॉप्टर बुकिंग पोर्टलचे उद्‌घाटन केले. पंचतरणीहून पवित्र गुहेचे अंतर केवळ ५ किमी राहते. भाविक श्री अमरनाथ देवस्थान मंडळाची वेबसाइट www.shriamarnathjishrine.com वर बुकिंग करू शकतात.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top