Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हत्येची बातमी पसरताच उदयपूरमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या हल्लेखोरांनी दुक...
हत्येची बातमी पसरताच उदयपूरमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत
नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या
हल्लेखोरांनी दुकानात घुसून तलवारीने केले वार
गळा चिरला, मारतांना व्हिडिओही बनविला
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
उदयपूर -
प्रेषितांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या एका टेलरची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून या टेलरला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. त्याची तक्रार त्याने पोलिसांतही केली होती. पण मंगळवारी भरदिवसा त्यांची त्यांच्या दुकानात शिरुन निघृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी तलवारीने त्यांच्यावर अनेक वार केले. एवढेच नाही तर त्यांचा गळाही चिरला. या संपूर्ण घटनेचा एक VIDEO व्हायरल झाला आहे. राजस्थानच्या उदयपूरची ही घटना आहे.

माप देण्याच्या बहाण्याने दुकानात शिरले
धानमंडी स्थित भूतमहल लगत सुप्रीम टेलर्स नामक दुकान आहे. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून 2 हल्लेखोर आले. त्यांनी माप देण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर कन्हैयालाल याच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्यांनी काही क्षणांतच त्यांच्यावर अर्धा डझनहून अधिक वार केले. त्यामुळे कन्हैयालाल यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर पसार झाले.

घटनास्थळी 3 पोलिस ठाण्याचे अधिकारी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धानमंडीसह घंटाघर व सूरजपोल ठाण्याचे पोलिसही घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलिस अधिकारी व एफएसएलचे पथकही घटनास्थळी पोहोचले. राज्याचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी पोलिस अधीक्षकांकडून घटनेचा आढावा घेऊन हल्लेखोरांना जेरबंद करण्याची मागणी केली.

6 दिवस होते दुकान बंद
कन्हैयालाल यांचे गोवर्धन विलास भागात वास्तव्य होते. 10 दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनाथ सोशल मीडियात एक पोस्ट टाकली होती. त्यानंतर एका विशेष समुदायाकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे कन्हैयालाल यांना भीतीने ग्रासले होते. भीतीपोटी त्यांनी 6 दिवस आपले दुकानही उघडले नव्हते. त्यांनी धमक्या देणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यावर पोलिसांनी त्यांना सांभाळून राहण्याचा सल्ला दिला होता.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top