Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अनिल ठाकुरवार अभ्यासू व्यक्तिमत्व - ॲड. वामनराव चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल ठाकुरवार अभ्यासू व्यक्तिमत्व - ॲड. वामनराव चटप  स्वामी विवेकानंद अनाथाश्रम संस्थेला आर्थिक मदत विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी ...
अनिल ठाकुरवार अभ्यासू व्यक्तिमत्व - ॲड. वामनराव चटप 
स्वामी विवेकानंद अनाथाश्रम संस्थेला आर्थिक मदत
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
समाजातील सर्वसामान्य लोकांच्या हाकेला ओ देणारा माणूस म्हणुन अनिल ठाकुरवार यांची ओळख होती. गरीब लोकांच्या वेदनेशी नाते सांगणाऱ्या या नेत्याने आपल्या राजकिय चातुर्याने आणि अभ्यासू वृत्तीने लोकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अवेळी जाण्याने पक्षाचीच नव्हे तर येथील सर्वसामान्यांची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतांना ठाकुरवार सरांची उणीव नेहमी भासणार असल्याचे मत माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
राजुरा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष, माजी प्राचार्य आणि स्वतंत्र भारत पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. अनिल महादेवराव ठाकुरवार यांची जयंती स्थानिक स्वामी विवेकानंद अनाथाश्रम येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमात ॲड.मुरलीधर देवाळकर, रमेश नळे व रजनी ठाकुरवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी मुख्याध्यापिका श्रीमती रजनी अनिल ठाकुरवार यांनी अकरा हजार रुपयांचा धनादेश संस्थेला दिला. यावेळी संस्थेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. वामनराव चटप होते. प्रमुख अतिथी ॲड.मुरलीधर देवाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, डॉ. सुभाष रेड्डीवार, माजी नगरसेवक मधुकर चिंचोलकर, दिलीप डेरकर, सुभाष रामगिरवार, मारोती येरणे, कपिल इद्दे, दिलीप देठे, प्रशांत देशकर, प्रशांत साळवे, प्रिया पेशट्टीवार, मारोती गव्हाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अनाथाश्रम प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन भाऊराव बोबडे यांनी केले. कार्यक्रमात अनाथ आश्रमातील विद्यार्थी सहभागी झाले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top