दिव्यांग कुटुंबाला मिळाला मदतीचा हात
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
जिल्हा परिषद चंद्रपूरच्या समाजकल्याण विभागामार्फत शेसफंडा अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शंभर टक्के अनुदानावर ई रिक्षा योजना राबिण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील उरकुडे यांनी पुढाकार घेत अनेकांना या ई रिक्षाचा लाभ मिळवून दिला असून नुकतेच चुनाला येथे ई रिक्षाचे वाटप करण्यात आले.
समाजकल्याण अंतर्गत राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील अनिल वांढरे यांना ई रिक्षाचा लाभ देण्यात आला लाभार्थी पायाने दिव्यांग असल्याने इतर मेहनती काम करता येत नव्हते किव्हा दुचाकींचा सुद्धा वापर करता येत नव्हता परंतु आता त्यांना स्वतःला ये-जा करणे व तालुक्याच्या ठिकाणी लोकांना ने आन करून कुटुंब चालवण्याकरिता काही प्रमाणात पैशाची मदत होईल व यातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करता येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.