Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रामपंचायत सातरी येथे जिल्हानिधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्रामपंचायत सातरी येथे जिल्हानिधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन माजी जिप सभापती सुनील उरकुडे यांच्या प्रयत्नातून रस्ता मजबुती करिता 5 ला...
ग्रामपंचायत सातरी येथे जिल्हानिधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन
माजी जिप सभापती सुनील उरकुडे यांच्या प्रयत्नातून रस्ता मजबुती करिता 5 लाखाचा निधी
विरेंद पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
जिप माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती यांनी तालुक्यात विविध गावात विविध विकास कामांकरिता विकासनिधी खेचून आणला त्यातच सातरी गावात सुद्धा अनेक काम मंजुर करवून घेतले त्यातले 5 लाखांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गावातील समस्त पदाधिकारी व ग्रामस्थांच्या साक्षीने पार पडले. उर्वरित मंजूर विकासकामांची सुद्धा लवकर पूर्तता होईल, तालुक्यात कुठल्याही गावाला मूलभूत विकासापासून वंचित राहू देणार नाही त्यासाठीच जनता आमच्यावर विश्वास ठेवून मतरूपी आशीर्वाद देत असतात असे प्रतिपादन सभापती सुनिल उरकुडे यांनी त्याप्रसंगी केले. कार्यक्रमानंतर सुनील उरकुडे यांनी उपस्थित ग्रामस्थांच्या समस्येवर चर्चा करून काही समस्यांचे निवारण करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
याप्रसंगी सातरी येथील सरपंच पद्माताई वाघमारे, उपसरपंच भाऊराव बोबडे, ग्रामसेवक पारखी मॅडम, प्रकाश बोढे, निशांत मून, वर्षाताई सातपुते, प्रांजुताई हेपट, बबीताताई टेकाम आदी ग्राप सदस्य, पोपा विजय पारशीवे, तं.मु.अ. अशोक चकोर, माजी सरपंच मंगेश मोरे, शंकर धुर्वे, मारोती कार्लेकर, अरुण कार्लेकर, बादल वाघमारे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी सभापती सुनिल उरकुडे यांचे आभार मानले आणि असेच सहकार्य गावाच्या पाठीशी असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top