धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
पोलीस स्टेशन गडचांदूर येथे फिर्यादी नामे रमेशचंद्र नारायण भालेराव वय ७० वर्ष गडचांदुर यांनी तक्रार दिली होती की ते व त्यांचे घर शेजारी राहणारे धनंजय घुले हे त्याचे कुटुंबासह बाहेर गावी घराला कुलूप लावुन गेले असता दिनांक १९ मे २०२२ ते दि ०३ जून २२ चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची तक्रार नोंदविली.
तक्रारकर्त्यानुसार त्यांच्या घराचा ताला तोडून ओनीडा एलइडी टी व्ही अंदाजे किंमत २२ हजार, सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर अंदाजे किंमत ८ हजार, जुना वापरता एसार कंपनीचा लॅपटाप अंदाजे किंमत ७ हजार, ५ ग्रॅम व ३ ग्रॅम सोन्याची दोन अंगठी अंदाजे किंमत २४ हजार, जुना वापरता एचपी कंपनीचा लॅपटाप अंदाजे किंमत ८ हजार असा एकूण ६९ हजाराचा माल चोरून नेला. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द पोस्टे गडचांदूर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला. गडचांदूर पोलीसांनी सदर गुन्हा उघडकीस आणुन आरोपी नामे मैनुददीन मन्सुर आलेख जिलानी वय २६ वर्ष, निवास अशोक रॉय वय २५ वर्ष, गजेंद उर्फ गज्या बालाप्रसाद ढगे वय २३ वर्ष, पियुष उर्फ अरुण सोनटक्के वय १९ वर्ष सर्व राहणार गडचांदूर यांना अटक केले असुन त्यांच्या कडून चोरीस गेलेल्या मालापैकी ओनीडा एलइडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर, जुना वापरता एचपी कंपनीचा लॅपटॉप असा एकूण ३८ हजाराचा माल तपासात जप्त केला. सदर आरोपीचा मा. न्यायालयातुन पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सपोनि प्रमोद शिंदे, नापोशि धर्मराज मुंडे, हेमंत धवणे, इंदल राठोड, पोशि विजय कोटणाके, तिरूपती माने, संदीप थेरे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.