Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वर्धा नदी व वन उद्यानात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वर्धा नदी व वन उद्यानात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनी शिवाजी महाविद्यालय येथील रासेयो पथक व नगर परिषदचा संयुक्त उपक्रम  ...
  • वर्धा नदी व वन उद्यानात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण
  • जागतिक पर्यावरण दिनी शिवाजी महाविद्यालय येथील रासेयो पथक व नगर परिषदचा संयुक्त उपक्रम 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या व नगर परिषद राजुराच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृतमहोत्सवी वर्ष, आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा उपक्रमांअतर्गत वर्धा नदी परिसरात प्लॅस्टिक, काचेच्या बाटल्या तसेच विघटन न होणारा कचरा असल्यामुळे नदीचा परिसर खराब झालेला होता व प्रदूषण सुद्धा वाढलेले होते, यावेळी स्वयंसेवकाद्वारा पाण्यातील तसेच पात्रातील प्लॅस्टिक, तसेच इतर कचरा सोबतच नदीच्या परिसरात इतरत्र पडलेला कचरा जमा करून ते नगर परिषदच्या कचरा विघटन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळेस एक ट्रॅक्टर कचरा गोळा केल्या गेला. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय राजुरा (प्रादे.) व रासेयो च्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वन उद्यान राजुरा येथे वृक्षारोपण तथा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आमदार सुभाष धोटे व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आमदार सुभाष धोटे यांनी रासेयो स्वयंसेवकांनी पर्यावरण रक्षणासाठी, वसुंधरेच्या रक्षणासाठी पुढे येऊन स्वच्छता अभियानासोबतच जनतेत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. त्यासारखे पुण्याचे काम दुसरे कोणतेही नाही. झोपडपट्टी भागात व्यसनमुक्ती, स्वच्छता, विविध विषयांवर जनजागृती रासेयो स्वयंसेवकांनी करावी असे प्रतिपादन केले. यावेळी वनविभागाचे कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक, नगर परिषद कर्मचारी, महाविद्यालयाचे कर्मचारीवृंद यांनी श्रमदान केले. 
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, अधीक्षक चोपडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. खेराणी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, डॉ. सारिका साबळे, डॉ विशाल दुधे, डॉ वनिता वंजारी, डॉ देठे, प्रा. शंभरकर, प्रा. पोतनूरवार, प्रा. दिनेश गोहणे, प्रा. प्रवीण पाचभाई प्रा सागर ओडलेवार व राजू होरे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन देशकर यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top