Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दिवाळखोरीत असलेला पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तान चीनला सोपविणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दिवाळखोरीत असलेला पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तान चीनला सोपविणार आमचा विदर्भ न्यूज नेटवर्क इस्लामाबाद - पाकिस्तान हा देश अक्षरशः आर्थिक दिवाळखो...
दिवाळखोरीत असलेला पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तान चीनला सोपविणार
आमचा विदर्भ न्यूज नेटवर्क
इस्लामाबाद -
पाकिस्तान हा देश अक्षरशः आर्थिक दिवाळखोरीला आला आहे. देशात महागाई गगनाला भिडली असून त्यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे आधीच मोडले आहे. भाज्यांच्या दरांनी शंभर व दोनशेचे दर पार केले असून पेट्रोल, डिझेल दोनशे रुपयांवर गेले आहे. त्यामुळे देशात हाहाकार माजलेला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आता काश्मीरमधील (पीओके) बेकायदेशीरपणे ताब्यात असलेला गिलगीट-बाल्टिस्तान हा वादग्रस्त प्रांत
चीनला भाड्याने देण्याचा विचार करत आहे. काराकोरम नॅशनल मूव्हमेंटचे अध्यक्ष मुमताज नगरी यांनी याबाबत माहिती दिली. असे झाल्यास भारताची डोकेदुखी पुन्हा वाढू शकते. मात्र, अमेरिका या कारवाईवर नाराजझाल्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) पाकिस्तानला मिळणाऱ्या मदतीवरही अडचणी येऊ शकतात.

सीपीईसीअंतर्गत करणार करार
गिलगीट बाल्टिस्तानमधील जनता सध्या भयभीत आहे. पाकिस्तान या प्रांताला भाडेतत्त्वावर चीनला देऊन त्याचा भविष्यात युद्धभूमीसाठी वापर करायला देऊ शकते. अशी चर्चा तेथे सुरू आहे, असे नगरी यांनी सांगितले. चीन पाकिस्तान इकॉनॉमी कॉरिडॉरच्या (सीपीईसी) अंतर्गत हा करार होऊ शकतो व चीन नैऋत्य दिशेने स्वत:च्या वाढीसाठी या प्रांताचा वापर करू शकते. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे देशाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो तसेच त्यामुळे पाकिस्तानवरचे आर्थिक संकट काही अंशी कमी होऊ शकते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top