Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार शिंदे गटात सामील - पोहचले गुवाहाटीत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार शिंदे गटात सामील - पोहचले गुवाहाटीत आमचा विदर्भ न्यूज नेटवर्क  चंद्रपूर - राज्यात सुरु असलेल्या राजकीय...
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार शिंदे गटात सामील - पोहचले गुवाहाटीत
आमचा विदर्भ न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर -
राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यात आज चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश झाला असुन सर्व प्रकारच्या राजकीय बातम्यांपासुन दुर्लक्षित असलेला चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अखेर शिंदे गटात सामील होण्याचे स्पष्ट झाले आहे. 
जोरगेवार हे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ह्यांच्या संपर्कात होते, मात्र आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुणाला समर्थन द्यायचे ह्याचा निर्णय त्यांनी आधी मतदार संघात घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले, त्यानंतरच सर्वांच्या इच्छेने ते शिंदे गटात शामिल झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top